Property Tax : उल्हासनगरात अभययोजनेतून महानगरपालिकेच्या तिजोरीत 49 कोटी 53 लाख रुपये जमा

उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगरकरांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी तीन टप्यात अभययोजना लागू केली होती.
Manisha avhale and neelam kadam
Manisha avhale and neelam kadamsakal
Updated on

उल्हासनगर - महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगरकरांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी तीन टप्यात अभययोजना लागू केली होती. 24 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान झालेल्या या तीन टप्यातील अभययोजनेत 49 कोटी 53 लाख रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

यावेळेस मागील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारी एकूण वसुली 123 कोटी 76 लाखाच्या वर झाल्याने वसुलीत आणखीन भर पडण्यासाठी अभययोजनेला 22 मार्च पर्यंत मुदतवाढ वाढ देण्यात 2024-25 या चालू वर्षाची फेब्रुवारी 23 तारखेपर्यंत 74 कोटी रुपयांची वसुली झालेली होती.

अशातच आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अभययोजना जाहीर केल्यावर 24 फेब्रुवारी ते 6 मार्च या पहिल्या टप्प्यात 100 टक्के व्याज व दंड माफीच्या पहिल्या टप्यातील 11 दिवसातच 117 कोटींच्या वर वसुली झाल्याने मागील वर्षाचा 112 कोटी रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे.

त्यानंतर 7 ते 12 मार्च या दुसऱ्या टप्प्यात 75 टक्के आणि 13 ते 18 मार्च या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यात 50 टक्के दंड व व्याज माफीची तरतूद करण्यात आली होती.अशा रितीने अभययोजनेच्या या तिन्ही टप्प्यात 49 कोटी 53 लाख रुपये तिजोरीत जमा झाले असून एकूण वसुलीचा उच्चांक हा 123 कोटी 76 लाखाच्या वर गेला आहे.

यासाठी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,उपायुक्त विशाखा मोटघरे,सहायक आयुक्त अजय साबळे आणि कर निर्धारक निर्धारक व संकलक निलम कदम यांच्या टीमने परिश्रम घेतले आहेत.

इतर विभागात बदली करण्यात आलेल्या सचिन वानखडे,मनोज गोकलानी,गणेश शिंदे आदींचे पुन्हा मालमत्ता कर विभागात कमबॅक करण्यात आल्याने त्याचे सकारात्मक पडसाद वसुलीत उमटले आहेत.

2023-24 मध्ये तत्कालीन आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी 112 कोटी रुपये वसुलीचा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. हा रेकॉर्ड आता आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, सहायक आयुक्त अजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निर्धारक व संकलक निलम कदम यांच्या टीमने 123 कोटी रुपये वसुल करून ब्रेक केला आहे.

दरम्यान 22 मार्च पर्यंत अभययोजनेची मुदतवाढ करण्यात आली आहे.त्यात 50 टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन कर निर्धारक व संकलक निलम कदम यांनी केल्याची माहिती सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com