

उल्हासनगर : महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी तीन टप्प्यात लागू केलेली अभययोजना फळली असल्याने मालमत्ता कर विभागाच्या कर निर्धारक व संकलक निलम कदम यांच्या टीमने अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली 126 कोटी 10 लाख रुपयांची आजमिती पर्यंतची रेकॉर्डब्रेक वसुली केली आहे.मात्र संधी दिल्यावरही अभययोजनेकडे पाठ फिरवणाऱ्या 100 करबुडव्यांबाबत महानगरपालिकेने आक्रमक पवित्रा हाती घेताना आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशान्वये त्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.