
उल्हासनगर : सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना जिद्दीने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बस्लटन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झालेले उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे(56) हे आयर्न मॅन ठरले आहेत.त्यांच्यावर महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.अशी स्पर्धा जिंकणारे ते भारतातील पिआय रँकचे पहिलेच अधिकारी बनले आहेत.मागच्या वर्षी ही स्पर्धा औरंगाबाद येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक इरमे यांनी जिंकली होती.