उल्हासनगर- दोन प्लॅस्टिक कारखान्यांवर पालिकेची छापेमारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

तब्बल दोन टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त

उल्हासनगर - सर्वत्र प्लॅस्टिकची निर्मिती आणि विक्री बंद असतानाच, रात्रीच्या वेळेस बेलाशकपणे प्लॅस्टिकचे कारखाने सुरू ठेवून पालिकेच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या उल्हासनगरातील दोन प्लॅस्टिकच्या कारखान्यांवर पालिकेने छापेमारी केली आहे. तब्बल दोन टन प्लॅस्टिक पिशव्या जप्त करताना या दोन्ही कारखाने सील करण्यात आले आहे.

कॅम्प नंबर 1 मधील दीप प्लॅस्टिक व कॅम्प नंबर 3 मधील अक्षय प्लॅस्टिक हे कारखाने रात्री सुरू राहतात आणि त्यात दररोज अनेक टन पिशव्या निर्मित केल्या जात असल्याच्या तक्रारी आयुक्त गणेश पाटील, उपायुक्त मुख्यालय संतोष देहरकर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीला गांभीर्याने घेऊन छापेमारी करण्याचे आदेश मिळताच जनसंपर्क अधिकारी तथा आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी विनोद केणे, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत, अजित गोवारी, मुकादम श्यामसिंग आदींनी दीप व अक्षय या प्लॅस्टिक कारखान्यांवर छापेमारी केली. 

सुरू असलेल्या कारखान्यात सर्रास प्लॅस्टिक पिशव्या निर्मित करण्याचे काम सुरू होते. या दोन्ही कारखान्यांना सील करून त्यातून दोन टन माल जप्त करण्यात आला.
 याशिवाय प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा बाळगणाऱ्या नॉन वोवन पॉलीप्रॉपिलीन या गोडावूनच्या मालकाकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जुलै अखेर पर्यंत 46 व्यापाऱ्यां कडून 2 लाख 60 हजार रुपयांची दंडात्मक रकम वसूल करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विनोद केणे,सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar- Police raids on two plastic factories