उल्हासनगरातील प्रांताधिकाऱ्यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी; मनसे पदाधिकाऱ्याच्या भाच्याला अटक 

उल्हासनगरातील प्रांताधिकाऱ्यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी; मनसे पदाधिकाऱ्याच्या भाच्याला अटक 


उल्हासनगर : पाच दिवसांपूर्वी उल्हासनगरचे उपविभागीय तथा प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या सरकारी गाडीवर दगड टाकल्याप्रकरणी मनसेचे पदाधिकारी योगीराज देशमुख याला अटक करण्यात आली होती. आता गिरासे यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी फेसबुकवर देण्यात आली असून, या प्रकरणात देशमुख याचा भाचा दिलीप सूर्यवंशी याला मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली आहे. 

24 तारखेला मनसेचे योगीराज देशमुख यांनी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या सरकारी वाहनावर मोठे दगड टाकून काचा फोडल्या होत्या. सरकारी भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाची दखल घेतली जात नसल्याने रागाच्या भरात गाडीवर दगड टाकल्याची कबुली देशमुख याने चित्रफितीद्वारे दिली होती; तर देशमुख यांची भेट गेल्या आठ महिन्यांत झाली नसून, जानेवारी महिन्यात भूखंडाचे प्रकरण निकाली लागल्याची माहिती गिरासे यांनी पत्रकारांना सांगितले होते. याप्रकरणी देशमुख याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर देशमुख याचा भाचा दिलीप सूर्यवंशी याने फेसबुकवर जगतसिंग गिरासे यांच्याविरोधात पोस्ट लिहून राग व्यक्त केला आहे. 

काय लिहिले आहे पोस्टमध्ये? 
पोस्टमध्ये सूर्यवंशी याने गिरासे यांना शिवीगाळ करून गाडीसह जाळण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार समजताच सहायक पोलिस आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी उपविभागीय कार्यालयात जाऊन जगतसिंग गिरासे यांची भेट घेतली. गिरासे यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी दिलीप सूर्यवंशी याला अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक योगेश गायकर हे करीत आहेत. 

Ulhasnagar governor threatened to burn with vehicle MNS office bearers niece arrested

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com