Ulhasnagar: उल्हासनगरात आयुक्तांनी अनाधीकृत वर्षा ऑर्केस्ट्रा बार केला जमीनदोस्त

Thane News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच आज पुन्हा महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला
Ulhasnagar: उल्हासनगरात आयुक्तांनी अनाधीकृत वर्षा ऑर्केस्ट्रा बार केला जमीनदोस्त
Updated on

Maharashtra Latest News | अवघ्या दोन बारवर कारवाई केल्यावर उल्हासनगर महानगरपालिका उर्वरित बारला अभय देत असल्याचा आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाचा इशारा देताच आज पुन्हा महानगरपालिकेने अनधिकृत विनापरवाना वर्षा ऑर्केस्ट्रा बारवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

पुण्यात काही तरुण अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पब, लेडीज बार आणि हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले आहेत

.

Ulhasnagar: उल्हासनगरात आयुक्तांनी अनाधीकृत वर्षा ऑर्केस्ट्रा बार केला जमीनदोस्त
Thane Ulhasnagar Crime: वाढदिवशी पार्टीमध्ये दारू कमी पडली! 'बर्थ डे बॉय'ला 3 मित्रांनी चौथ्या मजल्यावरून फेकलं

त्यानुसार 27 जून रोजी आयुक्त डॉ.अझिझ शेख यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त किशोर गवस,नोडल अधिकारी गणेश शिंपी यांच्या उपस्थितीत श्रीराम चौकातील अनधिकृत विनापरवाना ॲपल आणि अँगल ह्या ऑर्केस्ट्रा बारच्या बाहेरील बोर्ड,आतील काचा आणि टेबल तोडून टाकले होते.

मात्र ही कारवाई गुंडाळण्यात आल्याने मंगळवारी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र साहू,उपशहरप्रमुख शिवाजी जावळे,दिलीप मिश्रा,राजन वेलकर,सुरेश पाटील,वर्धन बोडारे आदींनी आयुक्त डॉ.अझिझ शेख यांना निवेदन दिले होते.अनेक बार पहाटे पर्यंत सुरू राहत असून त्यात नशेचा बाजार केला जात आहे.

Ulhasnagar: उल्हासनगरात आयुक्तांनी अनाधीकृत वर्षा ऑर्केस्ट्रा बार केला जमीनदोस्त
Ulhasnagar: उल्हासनगरच्या भाईवर गुटक्यासाठी टोळक्याचा जीवघेणा हल्ला !

तर एका बारमध्ये बांगलादेशी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात आहे.लॉजिंग बोर्डिंग देखील भरमसाठ असून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येणार असा इशारा धनंजय बोडारे यांनी निवेदनात दिला होता.

शिवसेनेच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन डॉ.शेख यांनी आदेश दिल्यावर नोडल अधिकारी गणेश शिंपी,सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव यांनी हिरा घाट चौकात असलेल्या अनधिकृत विनापरवाना वर्षा बारच्या बांधकावर तोडकाम कारवाई केली आहे.पाचसहा बारना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.काही बार मालकांनी न्यायालयात धाव घेऊन स्टे ऑर्डर घेतली आहे.विधी विभागा मार्फत यावर न्यायालयात बाजू मांडण्यात येणार असल्याचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सांगितले.

Ulhasnagar: उल्हासनगरात आयुक्तांनी अनाधीकृत वर्षा ऑर्केस्ट्रा बार केला जमीनदोस्त
Ulhasnagar MSEB: शॉक लागल्याने महावितरणच्या सिनिअर टेक्निशियनचा मृत्यू!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.