Kalyan West Assembly Constituency 2024 sakal
मुंबई
Kalyan West Assembly Constituency 2024 : महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस निर्णय घेतले जातील : उल्का महाजन
Vidhan Sabha Elections 2024 : कल्याणमधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज असताना, सचिन बासरे यांच्या नेतृत्वाखाली ठोस निर्णय घेतले जातील.
कल्याण पश्चिम येथे महाविकास आघाडीच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा गीता हॉल, शिवाजी चौक, कल्याण पश्चिम येथे पार पडला. विशेष म्हणजे, या मेळाव्याचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्य भारत जोडो अभियानाच्या समन्वयक उल्काताई महाजन यांनी केले. उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सचिन बासरे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यांच्या महिला सुरक्षेसाठीच्या वचनावर विश्वास व्यक्त केला.

