डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) क्षेत्रातील 65 बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात भूमाफियांनी चक्क घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.