esakal | अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' पॅरोलवर येणार तुरुंगाबाहेर

बोलून बातमी शोधा

daddy.jpg

...म्हणून अरुण गवळी येणार तुरुंगाबाहेर 

अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी' पॅरोलवर येणार तुरुंगाबाहेर
sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला गँगस्टर अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाने पॅरोल मंजूर केला आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणावरून हा जामीन मंजूर झाला आहे. पत्नीच्या आजारपणात पतीपेक्षा अधिक चांगली काळजी अन्य सदस्य घेऊ शकत नाही, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

गवळी (65) सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नीच्या आजारपणाचे कारण त्याने याचिकेत दिले आहे. पत्नीला तातडीने उपचारांची गरज आहे आणि वैद्यकीय तज्ञांची आवश्यकता आहे, त्यामुळे पॅरोल मंजूर करावा, अशी मागणी केली होती. कारागृह विभागीय आयुक्तांकडे याबाबत त्याने अर्ज केला होता. मात्र हा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे एड मीर नागमण अली यांच्यामार्फत त्याने नागपूर उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्या झेड ए हक आणि न्या अमीत बोरकर यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला असून गवळीची एका आठवड्यात सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Breaking : लॉकडाउन करण्यावर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत

कारागृह प्रशासनाकडून अर्जाला विरोध करण्यात आला होता. पत्नीची देखभाल करायला मुलगी आणि जावई आहेत असा युक्तिवाद केला होता. मात्र हा युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. कारागृहात असलेल्या बंदीला कुटुंबातील सदस्य आजारी असताना जामीन मंजूर होण्याचा नियम आहे. तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने पती पत्नीची काळजी घेऊ शकतो. नवऱ्याला देखील आपल्या बायकोची देखभाल करायची असते आणि जर ते शक्य झाले नाही तर मग पतीची मनस्थिती बिघडू शकते असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

शिवसेना मुंबईत उभारणार 'उर्दू भाषा भवन'

गवळीच्या पत्नीवर अत्यावश्यक शस्त्रक्रिया करायची आहे असा अहवाल आग्रीपाडा पोलिसांनी दाखल केला आहे. सन 2007 मध्ये जामसंडेकर यांची व्यावसायिक वैमनस्यातून हत्या झाली होती. या खटल्यात गवळीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यापूर्वीही गवळीला पॅरोल मंजूर झाला होता.

(संपादन - दीनानाथ परब)