
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला NCBने घेतलं ताब्यात
ड्रग्स प्रकरणात प्रोडक्शन वॉरंटवर घेतलं ताब्यात
मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे NCB ने ताब्यात घेतले. ड्रग्स प्रकरणात प्रोडक्शन वॉरंटवर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. NCBच्या तपासात टेरर फंडिंग संदर्भात काही महत्वाची माहिती मिळाली होती. त्यात ड्रग्ज तस्करी संदर्भातही माहिती होती. त्या अनुषंगाने NCB ने विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत आरोपींच्या चौकशीतून इक्बाल कासकरचे नाव समोर आल्यानंतर NCB ने चौकशीसाठी ठाणे कारागृहात असलेल्या इक्बाल कासकरचा ताबा मागितला आहे. (Underworld Don Dawood Ibrahim brother Iqbal Kaskar detained arrested by NCB in drugs case)
नुकतेच NCB ने दोन मोठ्या कारवाया केल्या होत्या. त्यात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स जप्त करण्यात आले होते. चरस संदर्भात पंजाब व काश्मीर येथून दुचाकीद्वारे येणाऱ्या ड्रग्ज तस्करांवर कारवाई करत २५ किलोचे ड्रग्ज NCBने आतापर्यंत जप्त केले आहेत. या प्रकरणात पुढे अंडरवर्ल्डचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार NCBने इक्बाल कासकरचा ताबा घेण्यात आला होता आणि त्याची काही तास चौकशीही NCBने केली.