Summary
१. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
२. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून मांडली भूमिका
३. सर्व गडकिल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामे पाडण्याची केली मागणी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या १२ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाला आहे. 'भारताचे मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीचे गडकिल्ले' या शीर्षकाखाली २०२४-२५ च्या यादीत हा समावेश झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून आपली भूमिका स्पष्ट केली. 'महाराजांनी रुजवलेला स्वराज्याचा विचार कुठवर पोहोचला होता, हे आता कळेल' असे ठाकरे म्हणाले.