
मोखाडा : मोखाड्यात अवकाळी वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आंबा आणि काजु बागाईतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर खोडाळा - विहीगांव रस्त्यावर मोहिते महाविद्यालयाजवळ झाड कोसळुन या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विद्युत पुरवठा देखील खंडीत झाल्याने, जनजीवन विस्कळीत झाले आहे.