Christmas | माथेरानमध्ये ख्रिसमसनिमित्त पर्यटकांचे अनोखे स्वागत; पालिकेकडून आकर्षक सजावट

Christmas | माथेरानमध्ये ख्रिसमसनिमित्त पर्यटकांचे अनोखे स्वागत; पालिकेकडून आकर्षक सजावट

माथेरान  ः थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे अनोखे स्वागत करण्यासाठी माथेरान-गिरीस्थान नगरपालिकेने प्रथमच अनोखी शक्कल लढवली आहे. प्रवेशद्वार दस्तुरी येथे ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे पर्यटकही या स्वागताने भारावून गेले आहेत. 

लॉकडाऊननंतर जास्त प्रमाणात पर्यटक माथेरानमध्ये दाखल होतील, असा अंदाज नगरपालिकेसह स्थानिक नागरिकांनीही लावला आहे. त्यामुळे येथील पर्यटक समाधानाने परतावा यामुळे अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच बांधकाम सभापती प्रसाद सावंत व अभियंता चेतन तेलंगे यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच पर्यटकांना प्रवेशद्वारात आनंद देण्यासाठी नाताळदिवशी सांताक्‍लॉजकडून स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारातच विद्युत रोषणाई करून पर्यटकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असून, मेरी ख्रिसमस करत काही पर्यटकांनी हा सण प्रवेशद्वारातूनच साजरा करत शुभेच्छा दिल्या. सुट्टीचा दिवस असूनही पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, गटनेते प्रसाद सावंत हे पर्यटकांच्या स्वागतासाठी दस्तुरी येथील प्रवेशद्वारात हजर होते. या वेळी कोव्हिडचे निकष पाळून नाताळ सण साजरा करावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले. तसेच काही पर्यटकांनी चांगल्या आयोजनाबद्दल पालिकेचे आभार मानले. 

Unique Christmas greetings to tourists in Matheran Attractive decoration from the municipality

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com