Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका 

Unmasking Happiness | कोरोनामुक्त रुग्णांना "गुलियन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका 

मुंबई  : कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक प्रकारचे आजार समोर येत आहेत. त्यातही रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये तर पोस्टकोव्हिड आजारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुंबईत "गुलियन बॅरी सिंड्रोम' (जीबीएस) या दुर्मिळ आजाराचेही रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे. 

कोणत्याही प्रकारच्या संसर्गातून बाहेर पडल्यानंतर किंवा पावसाळ्यात या आजाराचे रुग्ण सापडतात, असे केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्टचे म्हणणे आहे. कोव्हिडच्या संसर्गातून मुक्त झालेल्या मुंबईतील 24 जणांमध्ये या आजाराची लक्षणे दिसली होती. गुलियन बॅंरी सिंड्रोममुळे रुग्णाला अर्धांगवायू होतो. त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरत आहे. कोव्हिड- 19 आणि "जीबीएस' यांच्यातील परस्पर संबंध तपासण्यासाठी अनेक शहरांतील न्यूरोलॉजिस्टनी एकत्र येत त्याचा अभ्यास केला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये श्‍वसनाशी संबंधित हा दुर्मिळ आजार आहे. प्रसंगी या आजारात रुग्णांच्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. त्यामुळे रुग्णाच्या चेहरा, हात, पाय आदी भागांवर सूज येते किंवा पक्षाघात होऊ शकतो, असे केईएम रुग्णालयाच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी सांगितले. 

काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)? 
गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा एक दुर्मिळ विकार आहे. हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं, पाय, हात, फुफ्फुस तसेच श्‍वसननलिकेवरही हल्ला चढवतो. यामध्ये रुग्णांची अवस्था पक्षाघात आल्यासारखी होते. अनेकदा श्‍वास घेण्यास अडचणी निर्माण होतात. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार झाल्यास त्यातून लवकर बरे होता येते. 

काय आहेत लक्षणे? 
"जीबीएस'ची प्रमुख लक्षणे म्हणजे त्वचेत मुंग्या येणे किंवा खाज सुटणे, त्यानंतर स्नायू कमकुवत होणे, वेदना होणे आणि बधिरता येणे. पुढे रुग्णाला अर्धांगवायूचा त्रास सुरू होतो, जो तात्पुरता असू शकतो, परंतु 6-12 महिने किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतो. 

Unmasking Happiness Risk of corona free patients with Guillain Barry syndrome

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com