राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपा एक पाऊल मागे घेणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader Nana Patole, Balasaheb Thorat And BJP Leader Devendra Fadanvis

राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध? भाजपा एक पाऊल मागे घेणार?

मुंबई: राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोधी होण्याची (rajyasabha elections) शक्यता आहे. राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं भाजपाच्या काही नेत्यांचं प्राथमिक मत असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभा पोटनिवडणूक (Rajya Sabha election) बिनविरोध व्हावी, यासाठी राज्यातील काँग्रेस (congress) नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली होती. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव (rajiv satav) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

हेही वाचा: शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्सची विक्रमी ६० हजारांवर झेप

भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. सोमवार याबाबात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपकडून राज्यसभा पोट निवडणुकीतून माघार घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसात भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारी अर्ज माघार घेण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top