
मोखाडा : वातावरणातील बदल आणि पावसाच्या लहरीपणाचा फटका मोखाड्याला, वारंवार बसला आहे. बुधवार 4 डिसेंबर ला पुन्हा अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्यानंतर मध्यरात्री मुसळधार पावसाने मोखाड्याच्या वेगवेगळ्या भागाला झोडपले आहे. त्यामुळे शेतकर्यांची खळ्यावरील पीक झाकण्यासाठी चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यांनी खळ्यावरील पीक झाकण्यासाठी प्लास्टिक चा आधार घेतला आहे. या अवकाळीने शेतकरी मात्र, हवालदिल झाले आहेत.