कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

मुंबई - विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून मुंबईत सुरु होणार आहे. मात्र कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबतचा निर्णय पुढील जून महिन्यातच होणार असल्याचं समजतंय. आधीच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन एक आठवडा आधी गुंडाळण्यात आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनावरही कोरोनाचं सावट कायम असल्याचं चित्र आहे. 

मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी दुपारी उभय सभागृहांतील कामकाज सल्लगार समितीची बैठक विधानभवनात बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीबाबत अधिसूचना काढली नसल्यामुळे विधानभवनात ही बैठक झाली नाही. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चौथ्या लॉकडाऊनची मुदत 31 मेपर्यंत वाढवल्यामुळे, आगामी पावसाळी अधिवेशन नियोजित 22 जूनपासून घ्यायचे की लांबणीवर टाकायचं असा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नवनियुक्त 9 विधानपरिषद आमदारांचा सदस्यत्वाचा शपथविधी झाल्यानंतर संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार होती. मात्र त्या बैठकीसंदर्भात अधिसूचना विधानभवन सचिव कार्यालयातून काढण्यात आली नाही. या बैठकीबाबत तोंडी ठरलं होतं. ही अधिसूचना रविवारी जारी केली असती तरी लॉकडाऊनमुळे कामकाज सल्लागार समितीमधील सर्व सदस्यांना मुंबईत विधानभवनात बैठकीला कमी वेळेत पोहोचणं शक्य झालं नसतं. दरम्यान ही बैठक आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची माहिती विधानभवनातल्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे जून महिन्यात होणार पावसाळ अधिवेशनच्या कामकाजाबाबतचा निर्णयही पुढील जून महिन्यातच होईल. 

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतलं हे दुसरे अधिवेशन आहे. गेल्या मार्च महिन्यातील राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एक आठवडा आधी गुंडाळालं होतं.

update about this years maharashtra state assembly monsoon session

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com