esakal | मुंबईची मेट्रो सुरू करण्याबाबत मोठी अपडेट; कोणत्या अटी शर्थींसह मेट्रो येणार सेवेत? वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईची मेट्रो सुरू करण्याबाबत मोठी अपडेट; कोणत्या अटी शर्थींसह मेट्रो येणार सेवेत? वाचा

अनलॉक 4 या टप्प्यात देशातील मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यानुसार वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावरील मेट्रो 1 सेवा सप्टेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या हालचाली मेट्रो प्रशासनाने सुरु केल्या आहेत.

मुंबईची मेट्रो सुरू करण्याबाबत मोठी अपडेट; कोणत्या अटी शर्थींसह मेट्रो येणार सेवेत? वाचा

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : अनलॉक 4 या टप्प्यात देशातील मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यानुसार वर्सोवा अंधेरी घाटकोपर या मार्गावरील मेट्रो 1 सेवा सप्टेंबरपासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या हालचाली मेट्रो प्रशासनाने सुरु केल्या आहेत. त्यानुसार एक सीट सोडून एका प्रवाशाला बसण्याची मुभा देण्यात येणार असून एका ट्रेनची प्रवासी क्षमताही 50 टक्केनी कमी ठेवण्यात येणार आहे.

रायगडमध्ये होऊ शकते महाड इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती; जिल्ह्यात तब्बल इतक्या इमारती धोकादायक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील रेल्वे आणि मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. केंद्र सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असून त्यानुसार लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अनलॉकच्या पुढील 4 थ्या टप्प्यात देशातील मेट्रो सेवा सुरु करण्याचा विचार आहे. त्यानुसार मेट्रो 1 प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे मेट्रोमध्ये बसण्याबाबत निर्बंध आणण्यात येणार आहेत.

ट्रायच्या शुल्क आकारणीवर सुनावणी पूर्ण; उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

त्यानुसार एक सीट सोडून एका प्रवाशाला बसण्याची मुभा देण्यात येणार आहे. तसेच एका ट्रेनची प्रवासी क्षमताही 50 टक्केनी कमी ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी मेट्रोतून दरदिवशी साडेचार लाख प्रवासी प्रवास करत होते. आता या निर्बंधांमुळे मेट्रोतून दिवसाला सव्वा दोन लाख प्रवाशी प्रवास करतील, असे मेट्रो 1मधील सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे मेट्रो सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारची परवानगी मिळताच रेल्वे सेवा सुरु करण्यात येईल. यासाठी सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लागू शकतो असेही, त्यांनी सांगितले.

  • - लॉकडाऊनच्या कालावधीपासून चाचणीसाठी दिवसाला मेट्रोच्या चार फेऱ्या चालविण्यात येत आहेत.
  • - रेल्वे स्टेशन आणि इतर सुविधांची देखभालही सुरूच
  • - मेट्रो रेल्वे आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे चालूच

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top