उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला ‘राम राम’

टीम ई-सकाळ
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत कुरघोड्यांचा फटका सध्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मु्ंबईतील सहाही जागा गमवाव्या लागल्या आहेत. आता काँग्रेसमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील पक्षांतर्गत कुरघोड्यांचा फटका सध्या पक्षाला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मु्ंबईतील सहाही जागा गमवाव्या लागल्या आहेत. आता काँग्रेसमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

भाजपच्या गडात प्रथमच ‘जय विदर्भ’ नाही!

पत्राची दखल घेतल नाही
उर्मिला मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना पक्षाने मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही दिली होती. उर्मिला यांनी प्रचारात चांगली आघाडी घेऊन आशा निर्माण केल्या होत्या. पण, त्यांना अखेर पराभव पत्करावा लागला. भाजपचे नेते गोपाळ शेट्टी यांनी उर्मिला यांचा तब्बल ४ लाख ६५ हजार मतांनी पराभव केला होता. मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात खूप मतभेद आहेत. अनेकदा हे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. निरुपम यांनी ट्विटवरवरून अनेकदा देवरा यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केले आहे. त्या मतभेदांचा फटका पक्षाला बसत असल्याची तक्रार पक्षातून होत आहे. पक्षातील /e मतभेदांची दखल मातोंडकर यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यानच घेतली होती. त्यावेळी त्यांनी १६ मे रोजी पक्ष श्रेष्ठींना एक पत्र लिहिले होते. पण, पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून याबाबत कोणतिही दखल घेण्यात आली. त्यामुळे काँग्रेस सदस्यत्वाचाच राजीनामा देत असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

'मुंबईवर प्रेम करणारे अधिकारी नेमा'; मेट्रो कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला.

काँग्रेसला फटका  बसणार?
उर्मिला यांनी पक्षाची बांधणी करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले होते. पण, मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत लाथाड्यांना त्या वैतागल्या होत्या. कोल्हापूर सांगली येथील महापूरग्रस्त भागाला त्यांनी भेट दिली होती. तसेच मुंबईतून त्या भागात मदत पोहचविण्याचे कामही केले होते. तेथे त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला होता. उर्मिला यांच्या करिष्म्यामुळे मुंबई काँग्रेस आणि एकूणच काँग्रेसमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होईल, असे वाटत असतानाच त्यांनी पक्षाला राम राम केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urmila matondkar resigns from primary membership of congress