मुंबईत सुरू केलेल्या कार्यालयाबाबत उर्मिला मातोंडकर यांचे विरोधकांच्या टीकेला उत्तर

तुषार सोनवणे
Sunday, 3 January 2021

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी  शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, त्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. नुकतेच त्यांनी मुंबईत घेतलेल्या कार्यालयावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मुंबई - शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, अनेक मुद्द्यांवर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे. आता त्यांनी नवीन कार्यालय सुरू केले आहे. सेनेत प्रवेशानंतर काहीच दिवसात त्यांनी अभिनेत्री कंगनाच्या टीकांना उत्तर देणे सुरू केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

उर्मिलाने नुकतेच लिंकिंग रोडला कार्यालय उभारले आहे. हे कार्यालय सहाव्या मजल्यावर असून १ हजार स्वेअर फूट जागेत उभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे भाडे ५ ते ८ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. उर्मिला यांनी हे कार्यालय तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांना घेतल्याची माहिती मिळतेय.

परंतु या कार्यालयाबाबत माध्यमांमध्ये आलेल्या माहितीबाबत उर्मिला यांनी समाजमाध्यमांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती प्रसारित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन.नगर भागातील कार्यालय विकल्याचे उर्मिला यांनी म्हटले आहे. त्यातून जमा झालेल्या पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केले असल्याचेही त्यांनी म्हटलंय. आपल्या कार्यालयाबाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनाचाही त्यांनी समाचार घेतला आहे.

Urmila Matondkars reply to the oppositions criticism regarding the office started in Mumbai

--------------------------------

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Matondkars reply to the oppositions criticism regarding the office started in Mumbai

टॉपिकस