esakal | 'इश्‍यू व स्टार्ट' कार्यप्रणाली वापरा! एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

'इश्‍यू व स्टार्ट' कार्यप्रणाली वापरा! एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश

राज्यातील विभाग नियंत्रकांना इश्‍यू व स्टार्ट कार्यप्रणालीचा वापर करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

'इश्‍यू व स्टार्ट' कार्यप्रणाली वापरा! एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रकांना आदेश

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी बसमधून प्रवास करणारे वयोवृद्ध, महिला, लहान मुले, विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास आणि आसने पकडण्यासाठी प्रवाशांची होणारी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी राज्यातील विभाग नियंत्रकांना इश्‍यू व स्टार्ट कार्यप्रणालीचा वापर करण्याचे आदेश एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. वेळोवेळी सूचना देऊनही आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने विभाग नियंत्रकांना महामंडळाकडून फटकारण्यात आले आहे. 

हेही वाचा - शिवप्रेमींमध्ये आनंद! आठ महिन्यांनंतर 'रायगड'चा रोपवे पर्यटकांसाठी खुला

राज्यभरातील आगारात नियोजित वेळेत बस लागत नसल्याने प्रवाशी खासगी वाहतुकीचा पर्याय वापरताना दिसतात. परिणामी एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्यामुळे सुटण्याच्या नियोजित वेळेआधी 15 मिनिटे बस स्थानकावर उभी करावी. वाहकाने बसजवळ उभे राहून प्रवाशांची तिकिटे काढावी. बस वेळेत सुटणार असल्याचे प्रवाशांना आश्‍वस्त करावे. या उद्देशानेच एसटी महामंडळाने इश्‍यू व स्टार्ट कार्यप्रणाली अमलात आणली होती. मात्र या कार्यप्रणालीचा एसटीच्या विभागीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना विसर पडल्याने एसटीच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे एसटी वाहतूक महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना फटकारले असून, उत्पन्न वाढीच्या दृष्टीने या कार्यप्रणालीवर काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
Use the issue and start working instructions to the Divisional Controller of ST Corporation

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )