गतिमान कारभारासाठी समाज माध्यमांचा वापर 

file photo
file photo

मुंबई : मुंबई पालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्यासाठी समाज माध्यमांचा वापर वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. समाज माध्यमांद्वारे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा पालिकेचा प्रयत्न असून, आता केवळ एका क्‍लिकवर नागरिक आपल्या तक्रारी नोंदवू शकणार आहेत. पालिका या कामासाठी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला तीन वर्षांसाठी सहा कोटी रुपये अदा करणार आहे. समाज माध्यमांवर इतका खर्च करणारी मुंबई महापालिका एकमेव ठरणार आहे.

गेल्या काही वर्षांत संवाद साधण्याचे समाज माध्यम हे प्रभावी व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. समाज माध्यमांचा वापर करून केंद्र आणि राज्य सरकारे आपली कामे नागरिकांपर्यंत पोचवत असतात; मात्र जगातील सर्वांत श्रीमंत असलेली मुंबई महापालिका समाज माध्यमांपासून दूरच राहिली होती. यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेवर टीकाही झाली होती. त्यानंतर पालिकेने आपले वेबसाईट आणि ऍप बनवून नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचता यावे तसेच नागरिकांच्या समाज माध्यमांवरील तक्रारींची दखल घेता यावी म्हणून महापालिकेने सर्व विभागांसाठी केंद्रीय समाज माध्यम प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

माहिती तंत्रज्ञान सल्लागार मेसर्स केपीएमजी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व महाआयटी यांच्यामार्फत 35 आयटी ऑफिस सहायक व समाज माध्यम तज्ज्ञ आदी मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी 27 जून 2019 मध्ये करार केला आहे. 16 जुलै 2019 ते 15 जुलै 2022 पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन समाज माध्यम प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाणार आहे. यासाठी महाआयटी पाच कोटी 79 लाख 94 हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पालिकेच्या सात विभागीय कार्यालयांसाठी 21, आपत्ती व्यवस्थापन विभागात तीन, जनसंपर्क विभाग, रस्ते विभाग, उद्यान विभाग, पूल विभाग, आरोग्य विभाग तसेच घनकचरा विभागात प्रत्येकी एकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने नागरिकांना सेवा-सुविधांची माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांना आपले कर भरता यावेत म्हणून महापालिकेने www.portal.mcgm.gov.in वेब पोर्टल सुरू केले आहे. पालिकेच्या सोयी-सुविधा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच तक्रारींसाठी "एमसीजीएसएम 14 बाय 7' हे मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे. याबरोबरच महापालिकेचे "Mumbai, आपली BMC' @mybmc या नावाने ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. याद्वारे विविध विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट्‌स आणि कार्यक्रम नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com