esakal | हे म्हणातात...आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करा!
sakal

बोलून बातमी शोधा

हे म्हणातात...आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करा!

कोरोनामुळे कोकणातील आंबा उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यात आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सध्या प्रवासी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा या वाहतुकीसाठी उपयोग करावा, अशी मागणी अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाने राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे. 

हे म्हणातात...आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारावी : कोरोनामुळे कोकणातील आंबा उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यात आंब्याच्या वाहतुकीसाठी गाड्या उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. सध्या प्रवासी वाहतूकही बंद आहे. त्यामुळे आगारात उभ्या असलेल्या एसटी बसचा या वाहतुकीसाठी उपयोग करावा, अशी मागणी अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाने राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनामुळे कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामाच्या काळातच देशात लाॅकडाऊन लागू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा झाडावरच राहू दिला; मात्र आता संचारबंदी ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी तयार असलेल्या अंब्याचे करायचे काय, असा प्रश्न या उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. आंबा वाहतुकीला सरकारने परवानगी दिली आहे; मात्र यंदा दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने ट्रक उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे एकीकडे फळे झाडावर तयार होऊन गळायला लागली आहेत, तर दुसरीकडे दरातही घसरण होत आहे. कोकणातील शेतकऱ्याला जागेवर डझनभर आंब्याच्या पेटीला अवघे 800 ते 1 हजार रुपये मिळत आहेत. वाहतुकीची व्यवस्था न झाल्यास शेतकऱ्यांच्या हातात हेही पैसे पडणार नाहीत, अशी भीती उत्पादक व्यक्त करत आहेत. त्यामुळे सरकारने आगारातच उभ्या असलेल्या एसटी बसचा यासाठी वापर करावा, अशी मागणी पत्रकाद्वारे पक्षाचे उपाध्यक्ष सुहास बने, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलिम भाटी यांनी केली आहे.  एसटी बसमधील सीट काढल्यास मोठ्या संख्येने आंब्याच्या पेट्यांची त्यातून वाहतूक करता येईल, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. 


अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

एसटीचाही फायदा
हापुस आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटीचा वापर केल्यास एसटीच्याही उत्पन्नात भर पडेल. दुसरीकडे, आंबा मुंबई, पुणे वा अन्य शहरांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे पडतील व ग्राहकांनाही योग्य किमतीत तो मिळू शकणार आहे. त्यामुळे आंब्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर करू देण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, कोकणातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा विक्रीसाठी थेट नेटवर्क तयार केलेले आहे. त्यामुळे शेतकरी ठिकठिकाणी या पद्धतीने आंबा विकू शकतील, असे जनता दलाने म्हटले आहे.

loading image