नकोशी पाॅलिसी नागरिकांच्या माथी; कंपन्यांच्या नावे फोन करून फसवणूक

fake call
fake call sakal media

मुंबई : मोठ्या विमा कंपनीकडून (Big insurance company) मोठा परतावा मिळणार आहे, अशी खोटी माहिती देऊन त्या कंपनीची विमा पॉलिसी (insurance policy) नागरिकांच्या माथी मारण्याचा फसवणुकीचा एक नवा ट्रेंड (fraud new trend) सध्या सुरु झाला आहे. यात पैसे बुडत नसले तरी चुकीच्या माहितीमुळे (fake information) नको असलेली विमा पॉलिसी गळ्यात पडत असल्याची तक्रार नागरिक (people complaints) करत आहेत. ( Using Big insurance companies name for making insurance policy frauds against people desire)

fake call
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा; नगरसेवक भिडले

मुंबईच्या अंधेरी येथील रहिवासी आनंद शिराळी यांना नुकताच असा अनुभव आला. एका नामांकित विमा कंपनीची पॉलिसी तुम्ही यापूर्वीच घेतली आहे. तुमचे त्यात सव्वा लाख रुपये जमा आहेत. नियमानुसार तुम्हाला आणखी एक हप्ता (पंचवीस हजारांचा) भरावा लागेल; तरच तुम्हाला सर्व पैसे म्हणजे दीड लाख रुपये परत मिळतील. अन्यथा सव्वा लाख रुपयांवरही पाणी सोडावे लागेल, असे त्यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आले. शिराळी यांना आपण अशी पॉलिसी घेतल्याचे आठवत नव्हते. त्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला उडवून लावले. तरीही नंतर त्यांना सतत दूरध्वनी येत होते.

दूरध्वनी करणारी व्यक्ती त्यांना त्यांची जन्मतारीख, पॅन-आधार क्रमांक, घरच्यांची नावे, पत्ता आदी सर्व तपशील अचूक सांगत होती. त्यामुळे त्यांनी हा काय प्रकार आहे, हे तपासण्यासाठी आणखी चौकशी केली. समोरच्या व्यक्तीने पॉलिसीची बरीच स्तुती करून त्यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले; मात्र शिराळी यांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पैसे भरण्याचा आग्रह केल्यावर त्यांना मालाडच्या कार्यालयाचा पत्ता देण्यात आला. तेथे त्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर आमची अशी कोणतीच योजना किंवा प्रतिनिधी नसल्याचे त्याने सांगितले; मात्र अशा प्रतिनिधींच्या बोलण्याला फसून ज्यांनी कंपनीच्या विमा योजनेत ऑनलाईन पैसे भरले त्यांना या कंपनीने नवी पॉलिसी आनंदाने दिली, असेही शिराळी यांना सांगण्यात आले.

fake call
सरकारकडून विनाअनुदानित शाळांची उपेक्षा!

म्हणजेच यात फसलेल्या व्यक्तींचे पैसे बुडाले नसले तरी नको असताना अनेकांच्या गळ्यात पॉलिसी पडल्याचे स्पष्ट होते, असे शिराळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे फोन करणारी व्यक्ती तुमचे प्रतिनिधी नसल्याने त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार करण्याची विनंती शिराळी यांनी केल्यावर त्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना टाळले. याचा अर्थ त्या मिळणाऱ्या पॉलिसीच्या रकमेमुळे या कंपनीनेही या फसवणुकीकडे दुर्लक्ष केले किंवा संगनमतानेच हा प्रकार सुरू असावा, अशी शंकाही शिराळी यांनी व्यक्त केली.

चौकशी गरजेची

मुंबईत नको असलेली पाॅलिसी गळ्यात पडलेल्यांची संख्या मोठी असू शकते. त्यामुळे दुरध्वनीवरून नागरिकांची अशी फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेऊन या सर्व प्रकाराची सरकारी यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी. तसेच, फसवणुकीनंतर ज्या विमा कंपन्यांत नागरिकांनी पैसे भरले, त्यांचीही विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने चौकशी करण्याची गरज असल्याचे आनंद शिराळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com