esakal | उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटना; मुंबईकरांचे मृतदेह सापडले | Avalanche
sakal

बोलून बातमी शोधा

rajanikant yadav

उत्तराखंड हिमस्खलन दुर्घटना; मुंबईकरांचे मृतदेह सापडले

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली येथे काल झालेल्या हिमस्खलन दुर्घटनेत (avalanche accident) बेपत्ता झालेल्या पाचपैकी चार जणांचे मृतदेह (people death) आज सापडले. त्यातील दोघेजण मुंबईचे आहेत. भारतीय नौदलाच्या (Indian navy) दहा खलाशांचे पथक दोन आठवड्यांपूर्वी सात हजार मीटर उंचीच्या त्रिशूळ शिखरावरील मोहिमेसाठी गेले होते. शुक्रवारी पहाटे झालेल्या हिमस्खलनात पाचजण बेपत्ता झाले, तर उरलेले पाचजण सुखरूप आहेत.

हेही वाचा: स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना अयोग्य वागणूक देऊ नका - हायकोर्ट

या पाचजणांच्या शोधासाठी हेलिकॉप्टरमधून तसेच गिर्यारोहकांमार्फत प्रयत्न केले जात होते. आज यापैकी चारजणांचे मृतदेह मिळाले. लेफ्ट. कमांडर रजनीकांत यादव, लेफ्ट. कमांडर योगेश तिवारी, लेफ्ट. कमांडर अनंत कुकरेती व हरीओम (मास्टर चीफ पेटी ऑफिसर) अशी त्यांची नावे आहेत. यातील यादव आणि कुकरेती हे दोघे मुळचे उत्तर प्रदेशातील असून ते सध्या मुंबईत तैनात होते.

loading image
go to top