esakal | 'केंद्राच्या निर्देशांनुसार राज्यात लसीकरण करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना 
sakal

बोलून बातमी शोधा

'केंद्राच्या निर्देशांनुसार राज्यात लसीकरण करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना 

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. राज्यात मोहीम यशस्वीरीत्या राबवावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

'केंद्राच्या निर्देशांनुसार राज्यात लसीकरण करा'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना 

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई  : देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू होत आहे. राज्यात मोहीम यशस्वीरीत्या राबवावी. सर्व यंत्रणांनी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरणासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. 

"वर्षा' येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लस उपलब्धता, तिची वाहतूक, साठवणूक, प्रत्यक्ष लस देणे यासंदर्भातील तयारीविषयी माहिती घेतली. आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी यासंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणांनी समन्वयातून मोहीम यशस्वी करावी. पहिल्या टप्प्यात प्राधान्य गट एकमधील आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या गटातील पोलिस, सफाई कर्मचारी, केंद्रीय राखीव दलाचे जवान आदी कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. त्यामुळे राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया, त्याची वाहतूक, लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल, याची दक्षता या बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

लसीकरण सुरू झाल्यावरही कोरोना नियमांचे पालन करणे आवश्‍यक असणार आहे. प्रतिबंधासाठी आरोग्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. 

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Vaccinate in the state as directed by the Center Instructions to Chief Minister Uddhav Thackeray

loading image