राज्यात 18 हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण; लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद

राज्यात 18 हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण; लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद

मुंबई  : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी  लस  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ  करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी  सात वाजेपर्यंत  लसीकरण सुरू होते. सुमारे 18 हजार 338 हून  अधिक  (सुमारे 64 टक्के)कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

आज मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी  राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

राज्यात सकाळी 11 वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.


राष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. सातारा येथे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री  शंभूराज देसाई, औरंगाबाद येथे पालकमंत्री सुभाष देसाई, जळगाव येथे पालकमंत्री  गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.


सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) :* अकोला (238), अमरावती (440), बुलढाणा (575), वाशीम (167), यवतमाळ (307), औरंगाबाद (647), हिंगोली (200), जालना (287), परभणी (371), कोल्हापूर (570), रत्नागिरी (270), सांगली (456), सिंधुदूर्ग (165), बीड (451), लातूर (379), नांदेड (262), उस्मानाबाद (213), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१1266), भंडारा (265), चंद्रपूर (331), गडचिरोली (217), गोंदिया (213), नागपूर (776), वर्धा (344), अहमदनगर (786), धुळे (389), जळगाव (443), नंदुरबार (265), नाशिक (745), पुणे (1795), सातारा (614), सोलापूर (992), पालघर (257), ठाणे (1740), रायगड (260)

Vaccination of 18,000 employees completed in the state Expected response from staff to vaccination

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com