esakal | हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत लसीकरण थांबलं

बोलून बातमी शोधा

Dharavi
हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत लसीकरण थांबलं
sakal_logo
By
मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई: लसींच्या तुटवड्याचा फटका धारावीला देखील बसला आहे. लसींचा साठा संपल्याने धारावीसह माहिममधील लसीकरण बुधवारी थांबवण्यात आले. लोकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले. धारावीत मंगळवारी शेवटचे लसीकरण करण्यात आले. दिवसभरात 500 लाभार्थींना लस देण्यात आली असून आतापर्यंत 11 हजार 160 लाभार्थींची लसीकरण करण्यात आले.

धारावी, माहिम, दादर परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात देखील मंगळवारी 1291 लाभार्थींना लस देण्यात आली असून आतापर्यंत 25 हजार 926 लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. मुंबईत लसींचा तुटवडा जाणवतोय. जी उत्तर मधील देखील साठा संपला आहे. बुधवारी दुपारपर्यंत लसी येण्याची वाट पाहिली मात्र लसींचा साठा न आल्याने दुपारी दोन वाजल्यापासून धारावी आणि माहीम मधील लसीकरण केंद्र बंद केल्याचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

पालिकेनं धारावी पॅटर्न राबवून संसर्ग नियंत्रणात आणला. कोविडच्या दुसऱ्या लाटेत धारावीत देखील रुग्ण वाढू लागले. यावर नियंत्रणात आणण्यासाठी धारावीत देखील लसीकरणावर जोर देण्यात आला. धारावीत दाटी वाटीने लोकं राहत असल्याने त्यांचे वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबवावे लागले. याचा फटका धारावीला बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

---------------------

(संपादन- पूजा विचारे)

vaccination dharavi was suspended due depletion of stocks of vaccines