
लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या सुरूच असून त्यामुळे पालिकेच्या लसीकरण नियोजनाला ब्रेक लागला आहे.
मुंबई : लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या सुरूच असून त्यामुळे पालिकेच्या लसीकरण नियोजनाला ब्रेक लागला आहे. तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता असली; तरी लसीकरण सुरूच राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकाणी यांनी दिली.
राज्यासह मुंबईतदेखील 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणासाठी पालिकेने 10 केंद्रांवर जय्यत तयारीही केली. पहिल्या दिवशी चार हजार जणांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात 1,926 जणांचेच लसीकरण झाले. कोविन ऍपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील दोन दिवस लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. मंगळवारपासून पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करण्यात आली; मात्र कोविन ऍपमधील तांत्रिक समस्या कायम असल्याने लसीकरणात पुन्हा एकदा समस्या जाणवल्या. धीम्या गतीने लसीकरण सुरू असून मंगळवारीदेखील केवळ 1,596 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे पालिकेचे चार हजार लसीकरणाच्या नियोजनाचे लक्ष्य पूर्ण होऊ शकलेले नाही.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
दोन दिवसांच्या स्थगितीनंतर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली; मात्र कोविन ऍपमध्ये तांत्रिक समस्या अद्याप सुरूच आहे. याबाबत आम्ही सरकारशी संवाद साधल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पुढील दोन ते तीन दिवसांत ऍपमधील तांत्रिक अडचणी दूर होऊन नियोजनानुसार पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात करू, असा विश्वासही काकाणी यांनी व्यक्त केला.
.......
काय आहेत अडचणी
Vaccination planning hit in Mumbai Problems continue in the Covin app
---------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )