
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने कठोर कारवाई केली आहे. त्यांची उपमहासमादेशक होमगार्ड या पदावर बदली करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांच्या डीआयजी (कारागृह) पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.