Collector Sandip Manesakal
मुंबई
Thane News : ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातर्फे वामन म्हात्रेंचा निषेध; गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना केले निवेदन
बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक देणे वामन म्हात्रेंना भोवले.
ठाणे - बदलापूर येथे बालिकांवर अत्याचाराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या महिला पत्रकारांस अश्लील शब्दात समज देवून अपमानस्पद वागणूक करणारे अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या वर्तनाबद्दल वामन म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीचे निवेदन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संदीप माने यांना सादर करण्यात आले.
