
Vande Bharat : 'वंदे भारत एक्स्प्रेस'ने तीर्थयात्रा कशी कराल ? या तीर्थस्थानांपर्यंत सहज पोहोचता येणार
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. तीर्थयात्रा करू इच्छिणाऱ्यांसाठी या गाड्या वरदान ठरणार आहेत.
एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक- १८ वरून पंतप्रधान मोदींनी दोन्ही हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. (PM Narendra Modi)
यात्रेकरूंसाठी वरदान ठरणार
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील 9वी वंदे भारत ट्रेन असेल. नवीन ट्रेनमुळे मुंबई आणि सोलापूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.
सोलापूरमधील सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुकर होईल.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही देशातील 10वी वंदे भारत ट्रेन असेल. ही गाडी महाराष्ट्रातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनी शिंगणापूर या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना जाणार आहे.
मुंबई ते सोलापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सिद्धेश्वर, सोलापूरजवळील अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना उत्तम प्रवास सुविधा उपलब्ध होणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पीएम मोदी आज सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे ऑनलाइन उद्घाटनही करतील. यानंतर ते शिवाजी महाराज टर्मिनस येथून आयएनएस शिक्राला जातील. येथून हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळावर पोहोचतील.
त्यानंतर रस्त्याने, पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरातील मरोळ येथे जातील, तेथे ते सुमारे 4.30 वाजता अल्जामिया-तुस-सैफिया (सैफ अकादमी) च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन करतील आणि त्यानंतर संध्याकाळी ते दिल्लीला रवाना होतील.
अल्जामिया-तुस-सैफियाह ही दाऊदी बोहरा समुदायाची एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे, ज्याच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन होणार आहे.