Abhangvani Program Vasai : विठ्ठलाच्या नामसमरणात रंगले वसईकर; ‘अभंगवाणी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, यंग स्टार ट्रस्ट आणि समाज मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभंगवाणी’ कार्यक्रमात वारकरी दिंडी, संतांच्या अभंगांचे सादरीकरण आणि विठ्ठल नामस्मरणाने वसईकर भक्तिरसात तल्लीन झाले. या कार्यक्रमाचे प्रायोजक ‘सकाळ’ माध्यम होते.
Abhangvani devotional music program organised by Sahitya Jallosh in Vasai receives huge response

Abhangvani devotional music program organised by Sahitya Jallosh in Vasai receives huge response

Sakal

Updated on

विरार : पाऊले चालती पंढरीची वाट,मुखी हरी नाम आणि माउली माऊलीचा गजर करत वारकरी दिंडीने काल अवघ्या वसईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. या दिंडीत महापौर अजीव पाटील,स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी,माजी महापौर नारायण मानकर,,साहित्य जल्लोइश्चे कार्याध्यक्ष अशोक मुले, संदेश जाधव, समाजमंदिर ट्रस्टचे चेअरमन केवळ वर्तक,मॅनेजिंग ट्रस्टी संदेश वर्तक आणि यंग स्टार ट्रस्टचे प्रकाश वनमाळी ,वसई विकास बाकीचे चेअरमन आशय राऊत,जगदीश राऊत यांच्या सह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.साहित्य जल्लोष प्रतिष्ठान, यंग स्टार ट्रस्ट आणि समाज मंदिर ट्रस्ट यांच्या तर्फे काल समाज मंदिर सभागृहात अभंगवाणी कार्यक्रमा बरोबरच दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यक्रमाचे सकाळ माध्यम प्रायोजक होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com