
विरार - देशात आणि राज्यात आपला विजय रथाची घोडदौड करणाऱ्या भाजपची वसईमध्ये मात्र पाटी कोरी होती. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक निवडणुकीत वसईवर समाजवादी आणि काँग्रेसची मक्तेदारी होती. तर १९९० नंतर याठिकाणी बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व निर्माण केले होते. बविआची जवळपास ३५ वर्षाच्या एक हाती सत्तेला भाजपने सुरुंग लावला आणि अखेर कमळ फुलले. वसईमधून स्नेहा दुबे पंडित आणि नालासोपारा मधून राजन नाईक हे भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत.