वसईत केअर टेकर मौलानाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 caretaker Maulana

वसईत केअर टेकर मौलानाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नालासोपारा : वसईत एका मौलानाने 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना कळताच स्थानिक नागरिकांनी मौलानाला बेदम चोप देत रस्त्यावरून त्याची मारत धिंड काढत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. आज रविवार ता 27 रोजी सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नूरहुल्ला अश्रफ अली शेख (वय 24) असे विनयभंग करणाऱ्या वासनांध मौलानाचे नाव आहे.आज सकाळी 10 च्या सुमारास पीडित मुलगी ही दुकानांवर सुट्टे पैसे करण्यासाठी गेली होती.बाजूलाच उभा असलेल्या मौलाना ने मुलीला बोलावून मी तुला सुटे पैसे देतो असे सागून पीडित मुलीला कब्रस्थानात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मौलानाने मुलीचा विनयभंग केला असल्याची घटना स्थानिकांना कळताच संतप्त झालेल्या नागरिकांनी केअर टेकर असलेल्या मौलानाला पकडून बेदम चोप देत त्याची धिंड काढत त्याला वालीव पोलीस च्या ताब्यात दिले आहे.

मदरसा मध्ये हा केअर टेकर चे काम करीत होता. मुख्य मौलाना बाहेरगावी गेले असल्याने याला मदरसा ची काळजी घेण्यास सांगितले होते अशी प्राथमिक माहिती सध्या मिळाली आहे आम्ही या सर्व घटनेचा तपास करत आहोत. संबंधित इसमाला स्थानिक नागरिकांनी आमच्या ताब्यात दिले आहे. आम्ही गुन्हा दाखल करून त्याला अटक करत आहोत असे वालीव चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी सांगितले आहे.

Web Title: Vasai Caretaker Maulana Molested 10 Year Old Minor Girl

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..