Mumbai Crime: अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी 48 तासात केली अटक!

Crime: अल्पवयीनांचा शोषणकर्ता जेरबंद: वसई पोलिसांची सुस्तात धडाकेबाज कारवाई
Mumbai Crime:  अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी 48 तासात केली अटक!
Updated on

विजय गायकवाड

वसई विरार नालासोपारा परिसरात एकट्या अल्पवयीन मुलींना गाठून, त्यांना धाक दाखवून, जबरदस्तीने खेचत आडोशाला नेऊन, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा, सिरीयल रेपिस्टच्या 48 तासात, गुजरातच्या सुरत मधून मूसक्या आवळण्यात आल्या आहेत. वसई गुन्हे शाखा कक्ष 2 च्या युनिटला यश आले आहे.

या आरोपीने तुलिंज आणि आचोळा हद्दीत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, या आरोपीने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

Mumbai Crime:  अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी 48 तासात केली अटक!
Nashik Crime News : शांतीनगरमध्ये 3 ठिकाणी घरफोडी; 25 ते 30 तोळ्यांच्या वर सोने लंपास

वासनांध विकृत हा आरोपी 28 वर्षांचा आहे. हा नालासोपारा पश्चिम बस आगाराच्या बाजूच्या झोपड्यात तात्पुरत्या स्वरूपात राहत होता. मात्र हा मूळचा राजस्थान मधील रा दिंडोरी, नायगाव सुरत शहर, मुळगाव देसुरी, ता. देसुरी, जिल्हा पाली येथील राहणारा आहे. 13 फेबुरवरी रोजी नालासोपारा पूर्व आचोळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7 वर्षांची अल्पवयीन मुलगी चष्मा विसरल्याने घरी आली असता, तिच्या बिल्डिंग मध्ये येऊन, तिला एकटीला गाठून, तिचा हात पकडून, तिला जबरदस्तीने इमारतीच्या टेरेस वर नेऊन तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून फरार झाला होता. याबाबत आचोळा पोलीस ठाण्यात भादवी कलम 377, 363 सह पोस्को 4, 6, 8, 10 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या आदेशावरून, वसई गुन्हे शाखा कक्ष 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक शाहूरज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, यांच्या पुढाकारातून स्वतंत्र पथक निर्माण करून आरोपीचा तपास सुरू केला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, गुप्तबतमीदार यांच्या माध्यमातून प्रथम आरोपीची ओळख पाठवली असता, हा नालासोपारा पश्चिम बस आगारा जवळील झोपडीत तर कधी डोंबिवली, कल्याण परिसरात राहत असल्याचे समोर आले.

Mumbai Crime:  अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी 48 तासात केली अटक!
Pune Crime News : मार्केट यार्ड पोलिसांनी तडीपार गुन्हेगाराला पाठलाग करून पकडले

या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी दोन पथक पाठवली असता, तेथील माहिती वरून त्याचा मोबाईल लोकेशन घेतले असता हा आरोपी अजमेर ट्रेन ने गुजरात कडे जात असल्याची माहिती मिळाली असता याची माहिती तात्काळ सुरत सिटी क्राईम ब्रँच टीम ला देऊन त्यांच्या मदतीने सुरत येथे या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. आज शुक्रवार ता 16 रोजी त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या आरोपीने नालासोपारा पूर्व ओसवाल नगरी, बाबा संकुल जवळ ही 4 ते 5 महिन्यांपूर्वी 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत विनयभंग आणि पोस्को अंतर्गत तुलिंज।पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अशाच प्रकारचे आणखी किती गुन्हे या आरोपीने केले आहेत याचा तपास आता पोलीस करीत आहेत

Mumbai Crime:  अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला पोलिसांनी 48 तासात केली अटक!
Nashik Bribe Crime : बदापूर ग्रामपंचायत सदस्य रामनाथ देवडे लाच घेताना जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com