Folk Artist Honoured: श्रीलंकेत नृत्यशिरोमणी सन्मानाने वसईचा झेंडा उंचावला; लोककलावंत किरण राऊत यांचा गौरव

श्रीलंकेतील इंटरनॅशनल डान्स अँड म्युझिक ऑलिम्पियाडमध्ये वसईच्या किरण राऊत यांचा भारतीय लोकनृत्याला जागतिक व्यासपीठावर सन्मान, नृत्यशिरोमणी पुरस्काराने गौरव
Global Cultural Diplomacy: Kiran Raut Clinches Nritya Shiromani Title at Sri Lanka Olympiad

Global Cultural Diplomacy: Kiran Raut Clinches Nritya Shiromani Title at Sri Lanka Olympiad

Sakal

Updated on

विरार : वसईच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या लोककलेचा गौरव वाढवणारे प्रसिद्ध लोकनृत्य कलाकार किरण राऊत हे श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल डान्स अँड म्युझिक ऑलिम्पियाड फेस्टिव्हल २०२६ मध्ये सहभागी झाले होते . ९ ते १३ जून २०२६ दरम्यान कॅंडी, श्रीलंका येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्यांनी भारतीय लोकनृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. त्यांनी या कार्यक्रमात तामिळनाडूतील लोककला सादर केली होती. या स्पर्धेत त्यांना नृत्यशिरोमणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com