

A portion of the historic Matriz Church tower at Vasai Fort collapsed, raising fresh concerns over the conservation of the 500-year-old heritage structure.
Sakal
विरार : वसई किल्ल्यातील सुमारे ५०० वर्षांचा इतिहास जपणाऱ्या मत्रिझ ख्रिस्तमंदिर (चक्रीमाडी चर्च) येथील मनोरा आणि गाभाऱ्याच्या छताचा काही भाग कोसळल्याने ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा धोक्यात आल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी केंद्रीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्या कथित दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.