CM Devndra Fadnavissakal
मुंबई
Virar News : वसईच्या विद्यार्थ्यांची विधान भवनातील संसदीय सैर आणि मुख्यमंत्री भेट; आमदार सौ. स्नेहा दुबे पंडित यांचा पुढाकार
वसईच्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत ५ वी ते ७ वीतील ५० विद्यार्थ्यांना विधान भवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली.
विरार - वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे, यासाठी पावसाळी अधिवेशन २०२५ च्या निमित्ताने एक प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला. वसईच्या आमदार सौ. स्नेहा ताई दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत ५ वी ते ७ वीतील ५० विद्यार्थ्यांना विधान भवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली.