वसईतील जलतरणपटूंचा विक्रमी ‘सूर’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

तब्बल १९ कि.मी. अंतर तब्बल दोन तास ४० मिनिटांत पार  

विरार ः मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन तथा स्विमिंग फेडरेशन बंगालतर्फे ७६ वी लाँगेस्ट नॅशनल ओपन स्विमिंग स्पर्धा नुकतीच झाली. स्पर्धेत बंगालच्या भागीरथी पात्रातील तब्बल १९ कि.मी. अंतर तब्बल दोन तास ४० मिनिटांत पार करत शार्दुल विद्याधर घरत (रा. कळंब, वसई), राकेश रवींद्र कदम (रा.वसई) आणि कार्तिक संजय गुगले (रा.वसई) यांनी स्पर्धेवर वसईचे नाव कोरले. 

भागीरथी पात्रातील जलतरण स्पर्धेसाठी भारतासह देशाबाहेरील एकूण निवडक अशा ३५ जलतरणपटूंची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे या स्पर्धेत पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्‍यातील तीन जलतरणपटूंची निवड झाली होती. त्यांनी भागीरथी पात्राचे तब्बल १९ कि.मी.चे अंतर कमी वेळात पार करत विक्रम नोंदवला.

या तिघा जलतरणपटूंनी ही आव्हानात्मक जलतरण स्पर्धा दुसऱ्यांदा पूर्ण केली आहे. आता हे तिघे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभात राजू कोळी यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंड, आयरिश चॅनल खाडी सांघिक पद्धतीने सप्टेंबर-२०२० मध्ये पूर्ण करण्याची तयारी करत आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasai swimmers record 'tune' About 90 km Cross the distance in two hours in 5 minutes