वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव लांबणीवर? महोत्सव समितीच्या बैठकीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव लांबणीवर? महोत्सव समितीच्या बैठकीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष

विरार ः वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव हा गेल्या 30 वर्षांपासून वसईमध्ये सुरू आहे. दरवर्षी साधरणपणे 55 हजारांच्यावर स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होत असतात. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही स्पर्धा होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही स्पर्धा लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात लवकरच महोत्सव समितीची बैठक होणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष समितीच्या बैठकीकडे लागले आहे. गेल्या 30 वर्षांपासून कोणतीही बाधा न येता सुरू असलेला हा क्रीडा महोत्सव यंदा रद्द होणार का, विषयीदेखील चर्चा सुरू आहेत. 

वसई-विरार महानगरपालिका झाल्यानंतर 2010 पासून या ठिकाणी जिल्हा क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेची सुरुवात साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुब्रोतो फुटबॉल स्पर्धेने होते. या स्पर्धा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपतात. 11,14, 17 आणि 19 वर्षे वयोगटात ही स्पर्धा खेळविली जाते. इनडोअर आणि आउट डोअर अशा 43 प्रकारच्या स्पर्धा खेळविल्या जात असतात. 351 शाळा आणि जवळपास 20 हजार स्पर्धक सहभागी होतात. या स्पर्धेतून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्ध्येसाठी खेळाडूंची निवड केली जाते, तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेत खेळल्याने 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थांना जिल्हास्तरावर 5, विभागस्तरावर 10, राज्यस्तरावर 15 आणि राष्ट्रीय स्तरावर 20 गुण दिले जातात आणि हे गुण शाळांत आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्रात समाविष्ट करण्यात येतात; परंतु या वर्षी स्पर्धाच होण्याची श्‍यक्‍यता कमी असल्याने खेळाडू या गुणांना आणि राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेला मुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

वसई तालुका कला-क्रीडा महोत्सव सुरू झाल्यापासून या महोत्सवात अनेक विघ्न आली; परंतु हा महोत्सव कधी थांबला नाही. उलट या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत राहिला आहे. 5 हजार स्पर्धकांचा सहभाग असलेल्या या महोत्सवाने 55 हजारांचा टप्पा पार केला. मात्र यंदा कोरोनामुळे महोत्सव समितीची बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत स्पर्धेच्या आयोजनाविषयी निर्णय घेण्यात येईल. 
- प्रकाश वनमाळी,
सचिव, क्रीडा महोत्सव समिती 

Vasai taluka arts and sports festival postponed Students attention to the festival committee meeting

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com