विरार - वसई विरार मधली राजकीय स्थिती विधानसभा निवडणुकी नंतर बदलली आहे. पूर्वी वसई, नालासोपारा आणि बोईसर या तीन मतदार संघावर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व राहिले होते. परंतु आता मात्र तिन्ही जागेवर भाजपचा प्रभाव झाल्याने येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर आता पासूनच राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.