
विरार : थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करीत 12 व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉनमध्ये (VVMCM) हाफ मॅरेथॉनमध्ये खेळाडूंनी काही रेकॉर्ड आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. रविवार, ८ डिसेंबर रोजी देशातील सर्वोत्कृष्ट मॅरेथॉन स्पर्धेपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये ५८ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.