

Wealth and Assets of Top Candidates
Sakal
विरार : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. वसई-विरार महापालिकेच्या मतदानाची तारीख जवळ जवळ येत असताना, उमेदवारांच्या प्रचाराला सुद्धा वेग आला आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप याबाबत चर्चा होत असल्या तरी सर्वाधिक चर्चा ही या निवडणुकीतील उमेदवाराच्या संपत्तीची होत आहे. वसई-विरार मध्ये अनेक कोट्याधीश उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दोन उमेदवार हे अब्जाधीश असल्याचे दिसून येत आहे.