esakal | भाजपचा शिवसेनेला धक्का; आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची उचलबांगडी
sakal

बोलून बातमी शोधा

Dr.Surekha Walke

भाजपचा शिवसेनेला धक्का; आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांची उचलबांगडी

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार : वसई-विरार पालिकेत (vasai-virar municipal) गेल्या एक वर्षापासून प्रशासक राज असून त्यांच्या आडून शिवसेना (shivsena) येथे राजकारण (politics) करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्याही (employees transfer) ठाण्याच्या मंजुरी शिवाय होत नाही असे बोलले जात असतानाच भाजपने (BJP) थेट मुख्यमंत्र्याकडे (CM uddhav Thackeray) केलेल्या तक्रारी नंतर नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. सुरेखा वाळके (Dr Surekha Walke) यांची उचलबांगडी आयुक्त गंगाथरन डी. यांनी केल्याने हा शिवसेनेला गेल्या वर्षभरातील पहिला धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी तुळींज रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भक्ती चौधरी (dr bhakti Chaudhary) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा: माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम SC कडून रद्दबातल; तरीही ३०८ गुन्हे दाखल

वसई विरार महानगरपालिकेच्या स्थापने पासून बविआ ने शिवसेना, दोन्ही काँग्रेस आणि भाजपाला सत्ते पासून लांब ठेवले आहे. कोरोना मुळे वर्षभरापासून येथील निवडणुका रखडल्याने पालिकेवर प्रशासक म्हणून गंगाधरन डी. यांचे राज्य आहे. त्याच्या माध्यमातून शिवसेना याठिकाणी काम केट आहे असा आरोप खुलेआम पणे करण्यात येत आहे. त्यातच विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या तक्रारींची दखल आयुक्त घेत नसल्याचा आरोप करण्यात येत होता.

त्यातूनच डॉ. सुरेखा वाळके यांनी सुरुवातीपासूनच विशेषकरून कोविड-१९ संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याबाबत हलगर्जी आणि बेफ़िकिरी दाखवल्याने त्यांच्या विरोधात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती तर दुसर्या बाजूला भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष तसनीफ़ नूर शेख यांनी ही बाब त्यांनी आयुक्त गंगाथरन डी. यांच्याही निदर्शनास आणून दिली होती. कोविड-१९ काळात ड़ॉ. सुरेखा वाळके नागरिकांचे फोन उचलत नसल्याने त्यांच्या बाबत अनेक तक्रारी होत्या. वसई-विरार महापालिकेला राज्य सरकारकडून किती लसीं मिळतात व त्यांचे नियोजन कसे होते? याबाबतही त्यांना काहीच माहिती नव्हती.

उलट वेळोवेळी लसीकरण मोहिमेदरम्यान उडालेला गोंधळ व नियोजनाचा अभाव यामुळे डॉ. सुरेखा वाळके यांच्या बाबत नागरिकांत प्रचंड नाराजी होती.परंतु त्यांना राज्यातील एका मोठ्या मंत्र्याचे पाठबळ असल्याने त्या कोणालाही जुमान नसल्याचा आरोप करण्यात येत होता. आयुक्त आणि त्यांच्यातही समन्व्य नसल्याचे दिसून येत होते. त्यातूनच मग वाळके यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जात असले तरी यामध्ये भाजपने मात्र बाजी मारल्याचे चित्र याठिकाणी दिसत आहे.

loading image
go to top