ajit pawar
sakal
विरार - वसईकरांना पाण्याचा प्रश्न सतावत होता.त्यावेळी तत्कालीन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्य सरकारकडे सुर्या पाणी पुरवठा योजनेची मागणी केली होती. परंतु त्यावेळी वसई हे एमएमआरडीए क्षेत्राच्या बाहेर असल्याने त्यांना आर्थिक मदत कशी करणार असा प्रश्न पडल्यावर अजित दादांनी पुढाकार घेऊन या योजनेसाठी निधी देऊन वसईकरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला होता. त्याची आठवण आज वसईकराना झाली आणि वसई विरारकर नागरिक हळहळले.