वाशीतील सेल्फी कट्ट्याचे तरुणांना आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

स्मार्ट फोनच्या जमान्यात सेल्फी काढत सोशल मीडियावर पोस्ट करून हजारो लाईक्‍स मिळवण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते आणि या सेल्फी काढण्यासाठी नवनवीन व आकर्षक स्थळे शोधताना तरुण-तरुणींची नेहमीच लगबग सुरू असते आणि तरुणांची अशीच गर्दी वाशीतील सागर विहार रस्त्यावर असलेल्या भिंतीजवळ पाहावयास मिळत आहे. या भिंतीवर विविधरंगी आविष्कार करत चितारलेली चित्रे सध्या विलोभनीय ठरत आहेत.

नवी मुंबई : स्मार्ट फोनच्या जमान्यात सेल्फी काढत सोशल मीडियावर पोस्ट करून हजारो लाईक्‍स मिळवण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते आणि या सेल्फी काढण्यासाठी नवनवीन व आकर्षक स्थळे शोधताना तरुण-तरुणींची नेहमीच लगबग सुरू असते आणि तरुणांची अशीच गर्दी वाशीतील सागर विहार रस्त्यावर असलेल्या भिंतीजवळ पाहावयास मिळत आहे. या भिंतीवर विविधरंगी आविष्कार करत चितारलेली चित्रे सध्या विलोभनीय ठरत आहेत.

वाशीच्या सागर विहारकडे जाताना चर्चपासून अवघ्या काही अंतरावर पालिकेने सुशोभीकरण केलेल्या भिंतीवर कॉलेजच्या तरुणांनी आपल्या कलेची मुक्त उधळण करत आकर्षून घेणारी चित्रे रंगवली आहेत. स्थानिक नगरसेवक निधी विकास कार्यक्रमातून सुमारे तीन लाख रुपये खर्च करत हा सेल्फीचा अड्डा तयार करण्यात आला आहे. वाशी सागर विहार परिसर तसा आबालवृद्ध आणि महाविद्यालयीन तरुणांसाठी एकदम खास मानला जातो. स्टीलचा वापर करून वृक्षांच्या भोवती लावलेले कडे यामध्ये रंगीबेरंगी प्लेव्हरब्लॉक झाडांभोवती असलेले कट्टे यामुळे या परिसराला झळाळी प्राप्त झाली आहे. आता यामध्ये समोरच्या परिसरात सेवा रस्त्यावर मनपाने काही खास सजावट करून घेतली आहे.

मनपाने नगरसेवक निधीमधून तसेच मनपाच्या तिजोरीमधून ही सर्व सजावट करत भले मोठे कासव चितारले आहे व इतर चित्रे चितारली आहेत. ही चित्रे इतकी सुंदर आहेत, की या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडालेली असते. या भिंतीमधून रोखून बघणारे दोन डोळे या दोन डोळ्यांच्या मध्ये उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद या तरुणांच्या डोळ्यातून दिसून येतो. तरुणांसोबतच कुटुंबीयदेखील या परिसरात गुपचूप आपल्या सेल्फीची हौस भागवून घेतात.

सेल्फीसोबतच स्वच्छतेचाही संदेश
सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करून हजारो लाईक्‍स मिळवण्यासाठी तरुणाईची धडपड सुरू असते. एकीकडे स्वतःचा सेल्फी तर काढला जातो, त्यासोबतच स्वच्छतेचा संदेशही हजारोंपर्यंत पोहचला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Vashi Attraction of Selfie katta for youngsters