esakal | तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय? मग वापरा हा फंडा! वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय? मग वापरा हा फंडा! वाचा सविस्तर...

वरळीत झपाट्याने पसरणारा कोरोंनाचा संसर्ग लक्षात घेता खबरदारी म्हणून रहिवाशांनी बाहेर न जाता त्यांना सोसायतीतच भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी वरळी गांधीनगर येथील शिवालय सोसायटीने बाजारातून आणलेला भाजीपाला सोसायटीच्या टेरेसवर विक्रीसाठी ठेवला.

तुमच्या सोसायटीत ताजा भाजीपाला हवाय? मग वापरा हा फंडा! वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

प्रभादेवी:- वरळीत झपाट्याने पसरणारा कोरोंनाचा संसर्ग लक्षात घेता खबरदारी म्हणून रहिवाशांनी बाहेर न जाता त्यांना सोसायतीतच भाजीपाला उपलब्ध व्हावा यासाठी वरळी गांधीनगर येथील शिवालय सोसायटीने बाजारातून आणलेला भाजीपाला सोसायटीच्या टेरेसवर विक्रीसाठी ठेवला.
 

सरकार आणि पालिका प्रशासानच्या वतीने नगरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश वेळोवेळी देण्यात येत आहेत त्या नियमांचे पालन करत सोसायटीतील व्यक्तीना घरबसल्या भाजीपाला मिळावा या हेतूने हा फंडा  वापरल्याचे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राहिवाशांमध्ये सुरक्षित अंतर ठेवत एकेका मजल्यावरील रहिवाशांना टेरेसवर भाजी खरेदी करण्यासाठी सोडण्यात येत होते त्यामुळे गर्दी न करता प्रत्येक रहिवाशांना आपल्याला हवी ती भाजी घरबसल्या खरेदी करता आली.

loading image
go to top