विजय मनसेच्या 'मी उल्हासनगरकर' मोहिमेचा!

Me-Ulhasnagarkar
Me-Ulhasnagarkar

उल्हासनगर : महासभेत उल्हासनगरच्या सिंधुनगर नामांतराचा प्रस्ताव मागे घेण्यात आला. तर तसे पत्रही महापौर पंचम कलानी यांनी दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काल  दिवसभर सुरु ठेवलेल्या धरणे आंदोलनाची सांगता केली आहे. नामांतराच्या विरोधात राबवण्यात आलेल्या 'मी  उल्हासनगरकर' या मोहिमेचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया मनसेने व्यक्त केली आहे.

साईपक्षाच्या नगरसेविका कंचन लुंड यांनी उल्हासनगरचे सिंधुनगर नामांतराचा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. या प्रस्तावाच्या विरोधात उघड़पणे उडी घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची भेट घेऊन विरोध दर्शवला होता. धरणे आन्दोलनाचा इशारा दिला होता. समाजमाध्यमांवर देखील याचे पडसाद उमटल्यावर लुंड यांनी काल सोमवारी नामांतराचा प्रस्ताव मागे घेतला. ते पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले. मात्र  महासभेत प्रस्ताव मागे घेण्यात यावा अशी मागणी करत मनसेने आज, महासभेच्या दिवशी पालिकेसमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.

अन्याय विरोधी संघर्ष समितीचे सर्वेसर्वा दिलीप मालवणकर यांनी देखील समर्थन दिले. शेवटी सायंकाळी महासभा संपल्यावर महापौर पंचम कलानी यांनी साईपक्षाच्या नगरसेविका कंचन लुंड यांच्या कडून सूचवण्यात आलेला सिंधुनगर नामांतराचा प्रस्ताव विषय पत्रिकेतून वगळण्यात आल्याचे पत्र मनसेला दिल्यावर धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.

मनसेने नामांतराच्या विरोधात मी उल्हासनगरकर ही मोहिम राबवली होती. या मोहिमेचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया सचिन कदम, संजय घुगे, प्रदिप गोडसे, बंडू देशमुख,दिलीप थोरात,मनोज शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com