esakal | जाणून घ्या मुंबईतील शिवसेनेची स्थिति
sakal

बोलून बातमी शोधा

जाणून घ्या मुंबईतील शिवसेनेची स्थिति

मुंबईतील 16 जागा मिळवून आघाडीवर आहे. भाजपने 15 जागांवर आघाडी मिळवली आहे. असे असले तरी चेंबूर आणि भांडुप अशा दोन मतदारसंघांत शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे

जाणून घ्या मुंबईतील शिवसेनेची स्थिति

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मतमोजणीच्या पहिल्या दोन तासांत शिवसेना मुंबईतील 16 जागा मिळवून आघाडीवर आहे. भाजपने 15 जागांवर आघाडी मिळवली आहे. असे असले तरी चेंबूर आणि भांडुप अशा दोन मतदारसंघांत शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

वर्सोव्यात शिवसेना बंडखोराने भाजपला आणि अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजप बंडखोराने शिवसेनेला धक्का दिला आहे. काँग्रेस आतापर्यंत तीन जागांवर आघाडी टिकवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह इतर पक्ष अद्याप फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. 

आदित्य ठाकरे 12 हजार मतांनी आघाडीवर 

वरळीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 12 हजार मतांनी आघाडीवर आहेत. मातोश्रीच्या अंगणातील वांद्रे पुर्व मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोर आमदार तृप्ती सावंत चौथ्या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांना 9151 मते मिळाली आहेत. सावंत यांना 3135 मते मिळाली आहेत. काँग्रेसचे झिशान सिद्धिकी यांना 6119 मते मिळाली आहेत. 

वारीस पठाण पिछाडीवर 

भायखळा मतदारसंघातील एमआयएमचे विद्यमान आमदार वारीस पठाण पिछाडीवर आहेत. तेथे शिवसेनेच्या यामिनी जाधव आघाडीवर आहेत. 

मानखुर्द-शिवाजी नगरमध्ये दहाव्या फेरीअखेर सपचे आमदार अबू आमझी आघाडीवर असून शिवसेनेचे विठ्ठल लोकरे मागे पडले आहेत.

आझमी यांनी 39700 मते मिळवली. लोकरे यांना 10216 मते मिळाली आहेत.

WebTitle : vidhansabha election results mumbai trending candidates